भिरकावलेला कचरा
१. चीनचे अंतराळात भरकटलेले 'तियाँगगॉग' हे स्पेस स्टेशन अखेर पॅसिफिक महासागरात कोसळल्याचे वृत्त नुकतेच आले. दोन वर्षांपूर्वी संपर्क तुटलेले हे स्पेस स्टेशन पृथ्वीवर कोसळण्याची माहिती ‘युरोपियन स्पेस एजन्सी’ कडून देण्यात आली होती. हे स्पेस स्टेशन पॅसिफिक समुद्राच्या मध्यभागी असलेल्या ‘ताहिती’ या छोट्या देशाजवळ कोसळले.
२. इस्रोकडून यशस्वीरित्या प्रक्षेपण करण्यात
आलेल्या जीसॅट ६ए या स्वदेशी बनावटीच्या उपग्रहाशी संपर्क तुटल्याची धक्कादायक बातमी समोर
आली.
३. आंतराष्ट्रीय स्तरावर देण्यात येणाऱ्या 'ब्लू फॉग' या ऑस्कर दर्जाच्या मानांकनासाठी
भारताकडून ८ सुंदर बीचची निवड करण्यात आली आहे. त्यात सिंधुदुर्गतील 'भोगवे' बीच या महाराष्ट्रातील एकमेव बीचची
निवड करण्यात आली आहे.
या
सगळ्या घटनांमध्ये १-२ दिवसांचे अंतर आहे. पण एक साम्यदेखील आहे. - कचरा, मग तो कोणत्याही प्रकारचा असो - ई कचरा
,घान कचरा, रासायनिक पदार्थ, इत्यादी. पर्यावरणाच्या दृष्टीने घातक
असलेला हा कचरा सगळ्याच देशांची डोकेदुखी आहे.
पहिली
आणि दुसरी घटना आहे अंतराळयात सोडण्यात आलेल्या स्पेस स्टेशन आणि उपग्रह (
सॅटेलाईट ) विषयीची. अंतराळात साचणाऱ्या काचऱ्याबद्दलची (स्पेस जंक). ही गंभीर
समस्या अंतराळ मोहीम हाती घेतलेल्या सर्वच विकसित, विकसनशील देशांची आहे.यामुळे या देशांची झोप उडेल या
मार्गावर ही परिस्थिती येऊन पोहचली आहे. रशिया, अमेरिकेनंतर कॅनडा,इंग्लंड, फ्रान्स,चीन, भारत या सारख्या ५३ देशांनी दुसऱ्या
देशांच्या किंवा स्वतःच्या तंत्रज्ञानाच्या जोरावर आजपर्यंत ६५०० पेक्षा अधिक उपग्रह अंतराळात सोडले आहेत. आज पर्यंत
भारताने ९६ अंतरिक्षयान, ६६ लॉन्च मिशन, ९ विद्यार्थ्यांनी बनवलेले उपग्रह, २६७ परदेशी उपग्रह असे उपग्रह अंतराळात
सोडले आहेत. कृत्रिम उपग्रहांचा कार्यकाळ १० ते १५ वर्षापर्यंत निश्चित केलेला
असतो. काही उपग्रह गरजेच्या कक्षेत पाठवण्यात अपयश येते (घटना २ प्रमाणे) तर काही
उपग्रह भरकटतात. उपग्रहांचा कार्यकाळ संपल्यावर त्यांचा वापर बंद करण्यात येतो
त्या नंतर हे उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत फिरत राहतात. काही अनियंत्रित,निकामी उपग्रह एकमेकांवर आदळून त्याचे अवशेष अंतराळात फिरत राहतात. अशा प्रकारचा कचरा मानव अंतराळात निर्माण
करीत आहे. १९७९ मध्ये अमेरिकन स्पेस स्टेशनचे 'स्कायलॅब' हे अशाचप्रकारे पृथ्वीवर कोसळले होते.
त्यावेळी ऑस्ट्रेलियात त्याचे छोटे तुकडे विखुरले होते. 'तियाँगगाँग'च्या निमित्तानं स्कायलॅबची पुन्हा
आठवण येते. अर्थात अवकाशातील कचरा पृथ्वीबाहेरील वातावरणात तयार होत असल्याने
सर्वसामान्यांना याचा थेट फटका बसत नाही. त्यामुळे सर्वसामान्य याबद्दल अद्याप
अनभिज्ञ असतात.
तिसरी
घटना मात्र महाराष्ट्रसाठी अभिमानाची आहे. .समुद्राच्या पाण्याचा दर्जा, किनाऱ्याची स्वच्छता, पर्यावरण व्यवस्थापन या निकषांच्या
आधारावर 'भोगावे' बीचची निवड करण्यात आली. परंतु प्रश्न
उपस्थित होतो तो, भोगावे समुद्र किनारा हा आतापर्यंत कचरा मुक्त राहिला, या पुढे ह्या किनाऱ्याला प्रसिद्धी
मिळाल्याने हा किनारा तेवढाच स्वच्छ राहील का? कि भारतातील इतर समुद्राकिनाऱ्यांसारखा
हा ही किनारा अस्वच्छ होऊन या मानांकनातून बाहेर पडेल?
मानवाने
नुसता पृथ्वीवरच नाही तर पृथ्वी भौवतीही अंतराळात कचऱ्याचा ढीग लावायला सुरुवात
झाली आहे. जमिनीवर 'डम्पिंग ग्राउंड' आणि अंतराळात 'स्पेस जंक'. विकास होतोय तो कचऱ्याचा, कचरा कमी करण्याचा नाही. हाच आहेत तो वैज्ञानिक विकास. आणि हा वैज्ञानिक
विकास मानवाच्या सोईसाठी/ चैनीसाठी
असल्याने त्याला पर्याय नाही, उपाय मात्र आहेत आणि ते शोधले जातात.
प्रश्न उरतो तो त्याची सार्वत्रिक पातळीवर अंमलबजावणी करण्याचा.
आजपर्यंतचा इतिहास सांगतो, मानवाने जेव्हा जेव्हा पर्यावरणात हस्तक्षेप केला त्या-त्या वेळी पर्यावरणाचे आपले रौद्र रूप
दाखवले. त्यामुळे या बाबतीत सर्वच देशांनी/ धोरणकर्त्यांनी आणि त्या-त्या देशातील नागरिकांनी नुसतेच इको -फ्रेंडली म्हणून चालणार नाही तर त्या
दिशेने वैयक्तिक पातळीवर पावले उचलण्यास सुरुवात केली पाहिजे.

मस्त .....
ReplyDeleteThanks..suraj.
ReplyDeleteखूप सुंदर लेख आहे. आजच्या घडीला या विषयावर लक्ष वेधून, त्यातील परिणामाची जाणीव करून देण्याचा उत्तम प्रयत्न केला आहेस.
ReplyDeleteधन्यवाद अमेय. या विषयाकडे प्रत्येकाने जाणीव पूर्वक पाहणे खूप गरजेचे आहे. म्हणून हा प्रयत्न.
ReplyDeleteखूप छान आणि अभ्यासपूर्ण लेख. अजून वेगळे विषय वाचायला आवडतील. Keep it up!
ReplyDeleteधन्यवाद दादा..नक्कीच प्रयत्न करेल..
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteछान
ReplyDelete