Skip to main content

Posts

Showing posts from 2018

आधार'भक्ती'

आधार ' भक्ती '       आधारमुळे सामान्य नागरिकांच्या जीवनात खूप फरक पडलाय. त्याच आधाराने देशातील निवडणुकांनाही आधार दिलाय. विरोधी बाकावर बसणाऱ्यांना सत्तेत आल्यावर आधारच आधार ठरलाय. विरोधक असो व सत्ताधारी , वेठीस मात्र सामान्य माणूसच धरला गेला. शासनाच्या विविध योजना योग्य पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचाव्यात , त्यात मधल्या दलालांनी गैरफायदा घेऊ नये हा हेतू आधार मागे आहे. परंतु आज नागरिकांना त्यांच्या जीवनातील प्रत्येक मूलभूत गोष्टींचा (जीवनावश्यक घटकांचा) लाभ घेण्यासाठी आधार सक्तीचे करण्यात आले आहे.    आधारचा उपयोग नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ घेता यावा म्हणून करण्यात येणार असेल तर तो नागरिकांच्या जीवनावश्यक घटकांना जोडण्याचा सरकारचा आग्रह का ?   सरकारला जॅम ( JAM ) पूर्ण करण्याची घाई झाली आहे (जनधन , आधार , मोबाईल). यासाठी सरकार जनधन योजनेच्या सुरुवातीपासून घाई करत आहे. या जनधनमध्ये देशातील गरिबांची खाती आहेत. याशिवाय डीबीटीच्या माध्यमातून ही सर्व खाती मोबाइल नंबरला जोडण्यात यावी असा सरकारचा आग्रह आहे. सरकारकडून दावा करण्यात येतो की बँक घोट...

भिरकावलेला कचरा

भिरकावलेला कचरा १. चीनचे अंतराळात भरकटलेले ' तियाँगगॉग ' हे स्पेस स्टेशन अखेर पॅसिफिक महासागरात कोसळल्याचे वृत्त नुकतेच आले. दोन वर्षांपूर्वी संपर्क तुटलेले हे स्पेस स्टेशन पृथ्वीवर कोसळण्याची माहिती ‘ युरोपियन स्पेस एजन्सी ’ कडून देण्यात आली होती. हे स्पेस स्टेशन पॅसिफिक समुद्राच्या मध्यभागी असलेल्या ‘ ताहिती ’ या छोट्या देशाजवळ कोसळले. २. इस्रोकडून यशस्वीरित्या प्रक्षेपण करण्यात आलेल्या जीसॅट ६ए या स्वदेशी बनावटीच्या उपग्रहाशी संपर्क तुटल्याची धक्कादायक बातमी समोर आली. ३. आंतराष्ट्रीय स्तरावर देण्यात येणाऱ्या ' ब्लू फॉग ' या ऑस्कर दर्जाच्या मानांकनासाठी भारताकडून ८ सुंदर बीचची निवड करण्यात आली आहे. त्यात सिंधुदुर्गतील ' भोगवे ' बीच या महाराष्ट्रातील एकमेव बीचची निवड करण्यात आली आहे.    या सगळ्या घटनांमध्ये १-२ दिवसांचे अंतर आहे. पण एक साम्यदेखील आहे.   - कचरा , मग तो कोणत्याही प्रकारचा असो - ई कचरा , घान   कचरा , रासायनिक पदार्थ , इत्यादी. पर्यावरणाच्या दृष्टीने घातक असलेला हा कचरा सगळ्याच देशांची डोकेदुखी आहे.    ...