" देव माणसा " ...
आमच्या मुलाला मोबाईल मधल सगळं कळत,खिश्यातून मोबाइल काढून घेतो पापांच्या ,आणि संपूर्ण मोबाईल ऑपरेट करतो,आम्हाला ही माहित नाही त्या मोबाईल मधल तेवढ माहितीये त्याला ,काही शिकवावं लागत नाही त्याला मोबाईल वापरायचं ... अस अनेक पालकांच आपल्या मुलांबद्दल कौतुक चालू असत पाहुण्यानं समोर ...
मुलाने जेवताना एका जागी बसावे ,मुलं शांत बसावे अशा अनेक वरकरणी किरकोळ कारणांनी मुलाच्या हाती लहानपणीच मोबाइल येतो. पालकांची सोय म्हणून हाती आलेला मोबाइलवर सुरवातीला गंमत म्हणून सुरु केलेले खेळ हे भविष्यात खूप मोठा प्रश्न होऊन समोर उभा ठाकतो. 'पोकेमॉन गो' सारख्या खेळासाठी वेडी झालेली मुले किंवा आताच्या 'ब्लू व्हेल ' हा खेळ म्हणवणाऱ्या प्रकाराने इंटरनेट आणि खेळासाठी व्यसनी झालेली मुले.. साधारणपणे पौगंडावस्थेतील मुले या खेळाकडे जास्त आकर्षित होतात .ही अवस्था बदलांची आणि तेवढ्याच तणावाचे कारण असते . या काळात मुले पालकांपासून थोडी दुरावयाला लागतात. त्यांच्यात संवाद कमी होतो. त्याचवेळी मुले ' स्वतःला ' शोधण्याचा प्रयन्त करत असतात . पौगंडावस्थेतील काही मुला -मुलींना ते जसे आहेत तसे आवडत नाहीत , त्यामुळे मुलांच्या मनात न्यूनगंड तयार होतो .
जे खेळ मुले खेळात असतात त्यातही आपली 'हिरो' ची प्रतिमा मुले शोधू पाहतात आणि त्यातून समाजमाध्यमांचा किंवा खेळाच्या आहारी जातात .ऍक्शन गेम सारख्या खेळांमध्ये आणखी एक महत्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे धाडसाचा ( थ्रिल ) चा ..या वयात मुलांना धाडसाचे आकर्षण असते . त्याच्या परिणामांच्या विचारांपेक्षाही त्यातील मजा मुलांना खुणावते. 'स्व' सुखावणारे समाधान त्यांना मिळत असते. लहानपणी मुलांना शिकवले जाते की मारामारी करू नये ,चोरी करू नये, मोठ्यांचा मान राखावा,. वैगरे वैगरे .. पण तरीही मुले गेम खेळताना बंदुका घेऊनच मारामारी करतात.खरंतर मुलांना मोबाइल ,खेळ या साऱ्याची ओळख करून देण्यासाठी पालकच जबाबदार असतात . सध्या घडणाऱ्या घटनांमधून असे दिसतेकी अशा खेळांचे व्यसनाधीन असणारी बहुतांश मुले ही मध्यम आणि उच्च मध्यम घरातील असतात . आपल्या मुलांनी जगाशी जोडले जावे,शाळा महाविद्यालयातील प्रकल्प करणे सोपे जावे, मुलांनी स्मार्ट व्हावे म्हणून पालकांनीच घरी हौशीने इंटरनेट घेऊन दिलेले असते .शिवाय मोबाइलवर ही इंटरनेट पॅक उपलब्ध असतेच,पण आपली मुलं या साधनांचा नेमका काय वापर करतात हे पाहायला पालकांना वेळ नसतोच,आणि मुलांशी बोलायला तर नसतोच नसतो. या सगळ्यापासून मुलांना दूर ठेवायचे असेल तर पालकांचा संवाद हाच खरे तर प्रभावी उपाय आहे. मान्य की आता पालकांकडे फारसा वेळ नसतो,पण मुलांना अधिक वेळ देण्यापेक्ष्या मिळणारा वेळ त्यांच्या साठी अधिक चांगल्या प्रकारे वापरण्यावर पालकांनी भर देणे गरजेचे आहे. घरातील छोट्या छोट्या कामात मुलांना सहभागी करून घेणे,त्यांना फक्त मॉल मध्ये फिरायला न नेता मोकळ्या वातावरणात घेऊन जाणे,यातून मुलांचा पालकांशी असलेला संवाद ही वाढेल आणि त्यांचं नातंही सशक्त होईल..
मुलं मोठे व्हायला लागल्यावर त्याला शिकवण दिली जाते की अनोळखी माणसाने काही खाऊ दिला तर तो खाऊ नकोस,त्याच्याशी जास्त बोलू नकोस,नाव-गाव पत्ता त्यांना सांगू नकोस. मोबाइल,संगणकावरील खेळांबाबतही हाच सल्ला पालकांनी मुलांना दिला पाहिजे.आपल्याला भेडसावणाऱ्या समस्या,चिंता आपल्या जवळच्या माणसाशी बोलाव्यात असे मुलांना वाटेल अशी जवळीक पालकांनी मुलांशी साधली पाहिजे.. "मुले ही देवाघरची फुलं असतात, त्यांना जपायला पाहिजे .... !!"
संडे स्थान ....

Comments
Post a Comment