खड्डा न खड्डा...
सरकार आता दोन शहरांना जोडणारा दुवा म्हणून समृध्दी महामार्ग बांधण्याच्या तयारीत आहे . आणि नेतेच म्हणतात की डांबरी रस्ते बनावेत आणि त्यावर दरवर्षी खड्डे पाडावेत . 'ही नेत्यांचीच इच्छा असते' . मग मनात शंका येते की हाच का तो समृद्ध खड्डे विरहित महामार्ग ;कदाचित. पण जाऊ दे ना आपल्याला काय त्याच,... मंत्री बोललेत ना.मग टाळ्या पडल्याचं पाहिजेत .. आणि त्यांच्या या वक्तव्यावर टाळ्या पडतातच . परंतु याच खड्ड्यांमुळे निरागस लोकांचे जीव रोज जातात . मग याला जबाबदार कोण ?.
दुचाकीवरील एक तरुणी खड्डा चुकवण्याचा प्रयत्न करते काय आणि मागून येणाऱ्या ट्रकच्या धक्याने ही तरुणी जीवे जाते काय. . एक आई तिच्या मुलाला शाळेत सोडवण्यासाठी दुचाकी वरून जाते, रस्त्यातील एका "खड्डादूता" मुळे बसलेल्या धक्याने ते बारा वर्षाचे मुलं खाली पडले आणि मागून येणाऱ्या बसखाली चिरडले गेले . या घटना मुंबई -नाशिक महामार्गावरील आणि आपला महत्वाकांशी समृद्धी महामार्ग जाणाऱ्या नागपूर शहरामधील .. मग मुंबई उच्चन्यायालयाचे न्यायाधीश विचारतात,"यावर्षी पावसाळ्यात वीसपेक्ष्या अधिक जणांना खड्ड्यामुळे आपला जीव गमवावा लागल्याचे वृत्तपत्रातून समोर आले आहे ,आता पुढील पावसाळ्यापर्यंत आणखी किती जणांचे बळी तुम्ही घेणार आहात ?". आपल्या आजूबाजूला अगदी हायवे ते नाका कित्येक अपघात रोज होतात .अनेक जण त्यात आयुष्यभरासाठी अपंग होतात तर कित्येक जण रोज त्यात मृत्यू पडतात .वीसपेक्ष्या अधिक काय तर कित्येक पट अपघाती मृत्यू दरवर्षी होतात . एवढच की ते वृत्तपत्राद्वारे प्रसिद्ध होऊ शकत नाही .दर पावसाळ्यात खड्ड्याच्या बातम्यांनी वृत्तपत्राची पाने भरतात. वाचक ते सवयीप्रमाणे वाचतात आणि पान उलटतात . ते ही बरोबरच आहे म्हणा ,कोणाकोणाच्या मृत्यूचा रोज शोक करत बसणार . पण जाऊ दे ना आपल्याला काय त्याच.. रोज रस्त्याने जाताना तोच खड्डादूत रस्त्यात पुन्हा आडवा . कोण जबाबदार याला ? कोणाची चूक आहे यात? कदाचित ती चूक त्या जीव गमावलेल्या लोकांची. त्यांना वाहने नीट चालवता आली नाही,निष्काळजीपणे वाहन चालवतात . साधे खड्डे दिसत नाही का त्यांना . खरंतर शासनाने गंभीर गुन्हेच दाखल केले पाहिजे या निष्काळजी वाहन चालकांवर .शेवटी प्रश्न राज्यातील नियम-कायद्यांचा आहे. ते पळाले तर खड्डे कसे कोणाचा जीव घेतील . रस्त्यावरील खड्ड्याबद्दल आरडाओरडा करून व्यवस्थेला शिव्याशाप देणारे आपण,३-४ वर्षी पूर्वी भ्र्ष्टाचाराविरोधात मनात पेटलेल्या ज्योती घेऊन जंतर-मंतर वर उतरलो .आणि आज अचानक या ज्योती कशा विझल्या? भ्रष्टाचार तोडून काढण्या साठी,व्यवस्था बदलण्यासाठी केली होती ना लढाई ,झालो का विजयी? पण कोणी तरी झाला असेल ना विजयी. कंत्राटदार? प्रशासकीय अधिकारी ? का नेते? पण पुन्हा एकदा ,जाऊ दे आपल्याला काय त्याच.. आणि त्या बिचाऱ्या खड्ड्याना तरी किती बोल लावणार,त्यांना काय समजतं .पण आपल्याला तर समाजतना ,आपण विवेकी असलाच पाहिजे, आणि, आपला तर सरकारवर भरवसा हाययययय ना.... संडे स्थान ....
Comments
Post a Comment